Sindhudurg News: आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी ११ कोटींचा निधी मंजूर

0
89
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर!
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर!

▪️ भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदूर्ग I जिल्हा प्रतिनिधी- नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच, या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १०.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-नमसवाडी-ब्राह्मणाचा-जत/

सिंधुदूर्ग जिल्हयाचा पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीवासियांना विकासकामांची भेट दिली आहे. आंगणेवाडी मधील सोयी सुविधांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हयातील आंगणेवाडीला जोडणा-या सर्व रस्तांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्ता, मालवण बेळणा रस्ता, गोळवण पोईब रस्ता, ओझर कांदळगाव मागवणे मसुरे बांदिवडे आडवली भटवाडी रस्ता, राठीवडे हिवाळे ओवळीये कसाल ओसरगाव रस्ता, चौके धामापूर रस्ता व कुमामे नांदोस तिरवडे सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-लोककलेला-राजाश्रय-मिळण/

आंगणेवाडी हे मालवण तालुक्यातील सर्वात मोठे तिर्थक्षेत्र असून तेथील भराडीदेवी हे सुप्रसिध्द् आहे. दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी सूमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिध्द सिंधुदूर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोंबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरुन वाहतूकीची वर्दळ मोठया प्रमाणात असते. म्हणूनच सदर रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. तसेच, बिळवस आंगणेवाडी रस्ता हा ४.३०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम सुध्दा आता लवकरच सुरु होणार आहे. तसेच, चौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचा सिंधुदूर्ग जिल्हयातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here