वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान आह. तसेच काही भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके पडत आहे. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी परिसरात दि.२६, २७ व २८ नोव्हेंबर या कालावधीत पहाटेच्यावेळी पाऊसही पडला. या पावसाचा व ढगाळ हवामानाचा आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने आंबा पिकाची काळजी घेण्यासाठी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे उपाययोजना सुचविली आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-news-जगभरातील-लाखो-छायाचित्/
अनेक आंबा बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पालवी आलेली आहे. तर काही बागांमध्ये मोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे व धुक्यामुळे पालवीवर तसेच मोहोरावर करपा रोगाची शक्यता आहे. त्यामुळे पावलीवर व मोहरावर तपकिरी रंगाचे ठिफ उठून पालवी व मोहोर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान ढगाळ असल्यामुळे तुडतुड्याची पैदास मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी पालवी व मोहोरावर चिकटा पडून त्यावर काळी बुरशी वाढेल. अशा परिस्थितीत ज्या बागांमध्य पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे, अशा बागांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने शिफारस केलेली दुसरी फवारणी घेण्यात यावी. त्यासाठी १० लिटर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिली व कार्बेनडॅझिम १० ग्रॅम एकत्र मिसळून फवारणी करावी. ज्या बागांमध्ये पहिली फवारणी झालेली नाही अशा बागांमध्ये विद्यापिठाने शिफारस केलेली पहिली फवारणी तातडीने घेण्यात यावी. त्यासाठी डेल्टामेथ्रिन १० लिटर पाण्यात ९ मिली व कार्बेनडॅझिम १० ग्रॅम एकत्र मिसळून फवारणी करावी.


