वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे ८ डिसेंबर रोजी घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कृपा म्हाडदळकर तर खुल्या गटातून निर्जरा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-news-नाट्यमहोत्सवात-सहभागी/
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटासाठी ‘माझा आवडता लेखक‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-कृपा उत्तम म्हाडदळकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), द्वितीय-श्रावणी राजन आरांवदेकर (कुडाळ हायस्कूल), तृतीय-वरद संदेश प्रभू (लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणे), उत्तेजनार्थ-श्रृती श्रीधर शेवडे (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) व साध्वी अनंत मिडे (पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) तसेच खुल्या गटासाठी ‘वाचन संस्कृतीची गरज‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-निर्जरा संजय पाटील (वेंगुर्ला), द्वितीय-विभूती विजय ठाकूर (कुडाळ), तृतीय-प्रसाद विश्वनाथ खडपकर (नवाबाग), उत्तेजनार्थ-फाल्गुनी अजित नार्वेकर व लक्ष्मी प्रकाश प्रभूखानोलकर (बॅ.खर्डेकर कॉलेज,वेंगुर्ला) यांनी क्रमांक पटकाविला. खुल्या गटाचे परिक्षण अजित राऊळ व वैभव खानोलकर यांनी तर शालेय गटाचे परिक्षण प्रा.पी.आर.गावडे व वेदिका सावंत यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वृंदा कांबळी, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.डी.बी.राणे, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रा.सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय पाटील व प्रा.सचिन परुळकर यांनी प्रयत्न केले.
फोटोओळी – वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


