Sindhudurg News: ‘आपले संविधान‘ पुस्तकाचे प्रकाशन

0
23

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर संविधान दिवस ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस जिल्हा व मंडळ स्तरावर साजरा करत आहोत. या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला भाजपातर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे पुजन करण्यात आले.

रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान‘ या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रप्रमुख आर.के.जाधव, ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर यांच्या हस्ते झाले. संविधानामुळे देशाचे ऐक्य व एकात्मता समता टिकून आहे. संविधानाने समता, बंधुता, न्याय, समानता, स्वातंत्र्य बहाल केले असल्याचे आर.के.जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, प्रशांत प्रभूखानोलकर, बाबली वायंगणकर, शेखर काणेकर, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, दशरथ गडेकर, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडीस, भूषण सारंग, प्रणव वायंगणकर, शशी करंगुटकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – संविधान दिनाचे औचित्य साधून भाजपा कार्यालयात आपले संविधान‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here