वेंगुर्ला प्रतिनिधी- सर्वसामान्याना लाभ होईल अशा रोटरी उपक्रमाच्या माध्यमातून, गरजू जनतेसाठी सेवाभावी कार्य वाढवा आणि खेळातून रोटरी परीवारातील बंधुभाव जोपासा असे आवाहन सिंधुदुर्ग रत्नागिरी रोटरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२२च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे माजी प्रतपाल अविनाश पोतदार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर भावी पांतपाल शरद पै, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स चेअरमन अशोक नाईक, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर व निलेश मुळये, आरडिसी राजेश रेडिज उपस्थित होते.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी रोटरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२२ चे भव्य आयोजन १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी सुनील गावस्कर स्टेडियम , कॅम्प वेंगुर्ला येथे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने करण्यात आले आहे. यातील क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम,मिटर रिले या सर्व स्पर्धांचे उद्घाटन माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांच्या हस्ते झाले. यावेळी भावी प्रांतपाल शरद पै, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स चेअरमन अशोक नाईक यांनी उत्कृष्ट आयोजनासाठी रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनचे कौतुक करीत, सर्व रोटरी क्लब खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट सुनील रेडकर तर स्वागत इव्हेंट चेअरमन दिलीप गिरप, क्लब स्पोर्ट्स डायरेक्टर अनमोल गिरप, संजय पुनाळेकर, योगेश नाईक यांच्या हस्ते कल्पवृक्ष व मानचिन्ह देऊन करण्यात आले. या सोहळ्याचे सुत्रसंचालन रोटरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर राजेश घाटवळ यांनी केले.
फोटोओळी – सिंधुदुर्ग रत्नागिरी रोटरी रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२२ चे उद्घाटन प्रसंगी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, शरद पै, अशोक नाईक, दिपक बेलवलकर, सुनील रेडकर आदी उपस्थित होते.