लवकरच दोन्ही रस्ते दुरुस्तीची कोकण रेल्वे चीफ इंजिनिअर श्री. नागदत्त यांची ग्वाही
कोकण रेल्वेच्या हद्दीतील कणकवली रेल्वे स्टेशन ते नरडवे रोड व ओरोस रेल्वे स्टेशन ते रानबांबुळी मुख्य रोड हे दोन्ही रस्ते पूर्णतः खड्डेमय झाले आहेत. रेल्वे स्टेशन वर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे.तसेच धुळीचा त्रास देखील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी नवी मुंबई बेलापूर येथील कोकण रेल्वेचे चीफ इंजिनिअर श्री. नागदत्त यांच्याशी चर्चा करत दोन्ही रस्ते १५ दिवसात दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मागील आठवड्यात दिला होता. आ. वैभव नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन श्री. नागदत्त यांनी लवकरच हे दोन्ही रस्ते दुरुस्त करण्याची ग्वाही दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/sinhudurg-news-बुध्दीबळ-क्रीडा-स्पर्ध/


