कुडाळ – जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, सहकारी संस्था, बिगर सरकारी संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी व पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेलस् अशा ठिकाणी कुडाळ तालुक्यामध्ये तंबाखू नियंत्रण समितीने धाड सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सामितीमार्फत हि धाड टाकण्यात आली अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-news-जगभरातील-लाखो-छायाचित्/
या धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व कुडाळ पोलिस विभागामार्फत तालुक्यातील 11 ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुपये 2 हजार 200 व पोलिस प्रशासन मार्फत रुपये 2 हजार 200 असे एकूण रुपये 4 हजार 400 एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-सिया-न्यायासा/
या धाड पथकाध्ये जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा सल्लागार, संतोष खानविलकर, सायकॉलॉजिस्ट किरण कनकुटे, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अल्मेडा, समुपदेशक गायत्री कुडाळकर तसेच पोलिस विभाग कुडाळ यांचेकडून पोलिस उपनिरीक्षक राजेद्र दळवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल भगत, पोलिस नाईक बंडगर इत्यादींनी या धाड पथकात सहभाग घेतला होता
[…] […]