वेंगुर्ला प्रतिनिधी- क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १९ वर्षाआतील जलतरण व ड्रायव्हिंग या स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या कुणाल संदिप पेडणेकर याने यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एकल-वापर-स्ट्रॉ-ताट-कप-प/
क्रिडा संकुल ओरोस येथे घेतलेल्या जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्रि स्टाईल, १०० मी. फ्रि स्टाईल, ५० मी. फ्रि स्टाईल या प्रकारात कुणाल पेडणेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची शालेय विभागीय स्तरावर होणा-या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुणालला प्राचार्य डॉ.विलास देउलकर, जलतरणचे प्रशिक्षक दिपक सावंत, हेमंत गावडे तसेच शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो – कुणाल पेडणेकर.