जिल्हा टोलमुक्त करण्याठी एकत्रीत येण्याची गरज ; जिल्हा टोल मुक्ती समिती सामिल होण्यासाठी नंदन वेंगुर्लेकर यांचे ईच्छुकांना आवाहन
सिंधुदुर्ग– मुंबई -गोवा महामार्ग गेले ७ वर्ष बांधणें चालू आहे. महामार्ग पूर्ण होण्याआधीच वाहनांना आकारण्यात येणाऱ्या टोलनाक्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.लवकरच टोल आकारण्यात येणार आहे. महामार्गावर जागोजागी खड्डे आहे,काही ठिकाणी पर्यायी रस्ते पूर्णत्वास आलेले नाहीत. अनेक ठिकाणी महामार्गाचे निकृष्ट बांधकाम नजरेस येत आहे आणि तरीही वाहनांना टोल आकारण्यात येणार आहे हे चुकीचे असून महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय टोल देण्यास कोकण वासीयांचा विरोध आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-गोष्ट-एका-पैठणी/
कोकण वासीयांनी या विरोधात सिंधुदुर्ग टोल मुक्ती समिती स्थापन केली आहे. ” या समिती मध्ये जे कोण सहभागी होण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी कृपया आपली नाव द्यावीत यामध्ये प्रत्येक तालुक्यातील कमीत कमी 3 व्यक्तीचा सहभाग असावा. सदरील व्यक्ती ही सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असावी. तसेच सामाजिक संघटना, तीन आसनी, रिक्षा सहा आसनी रिक्षा, वकील संघटना, डॉक्टर, टेम्पो, ट्रक तसेच डंपर चालक, व्यापारी संघ, शेतकरी संघटना, पर्यटन व्यावसायिक संघटना, पत्रकार संघटना मधील असावा.
त्याव्यतिरिक्त जरी कोणी इच्छुक असेल तरी 9422434356 या नंबर वर कॉल किंवा what’s app मेसेज करून संपर्क करावा असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग वासीयांना आणि इच्छुकांना आवाहन केले आहे. त्याशिवाय इतर जिल्ह्यातील कुठली संघटना कार्यरत असतील आणि त्यातील कोणी सहभागी होण्यासाठी इच्छुक असेल तरी पण संपर्क करण्यास हरकत नाही असेही आवाहन केले आहे.


