वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-लोककलेला-राजाश्रय-मिळण/
वाचक स्पर्धेसाठी ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती‘ यावर १० मिनिटांमध्ये परीक्षण करावयाचे आहे. स्पर्धक हा वेंगुर्ला तालुक्यातील एखाद्या वाचनालयाचा नियमित वाचक असल्याचा दाखला आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००, २५०, १५० अशी पारितोषिके दिली जातील. तसेच वेंगुर्ला शहराबाहेरुन येणा-या स्पर्धकाला स्पर्धेला येण्याजाण्याचा प्रवास खर्च म्हणून १०० रुपये देण्यात येतील.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-नमसवाडी-ब्राह्मणाचा-जत/
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेता येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम पाच क्रमांकांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० ३०० व २०० अशी पारितोषिके देण्यात येतील. इच्छुकांनी वाचनालयाच्या माध्यमातून २३ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी वेंगुर्ला नगर वाचनालय येथे संफ साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.