Sindhudurg News: पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाच्या निवड चाचणीला जिल्ह्यातून प्रतिसाद

1
169

वेंगुर्ला प्रतिनिधी- माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाअभिनव फाऊंडेशन -सावंतवाडी आणि किरात ट्रस्टवेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाकरिता निवड चाचणी लेखी परीक्षा ८ नोव्हेंबर रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात संपन्न झाली. या परीक्षेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

कार्यक्रमाच्या उदघाट्नप्रसंगी खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद बांदेकरमाजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित केरकरकिरात ट्रस्टच्या सीमा मराठेअभिनव फाऊंडेशनचे ओंकार तुळसुलकरक्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकरजयवंत चूडनाईक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचे काम शशांक मराठेओंकार तुळसूलकर आणि समीर घोंगे यांनी पहिले. याकामी खर्डेकर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिने प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

फोटोओळी – पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाकरिता निवड चाचणी लेखी परीक्षेला जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here