प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
शिरगाव: जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियानांतर्गत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शैक्षणिक उपक्रमा द्वारे दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी कोळोशी हडपिठ येथील शाळेतील विद्यार्थी व पालक यांना जीवन विद्येच्या तत्व ज्ञानावर आधारित शिल्पकार या कोर्सचे सौ श्रध्दा गणेश राणे यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्गाला UPSC, MPSC, BANKING, STAFF SELECTION , MELEITARY च्या स्पर्धा परीक्षांचे अचूक करियर मार्गदर्शन करणारे नामांकित मार्गदर्शक श्री सुहास सीताराम पाटील यांचे व्याख्यान झाले तसेच मुख्याध्यापक श्री प्रमोद लोके सर , सौ अश्विनी गर्जे यांचे मोलाचे सहकार्य लाभले
सरस्वती विद्या मंदिर कुवळे शाळा क्रमांक १ कुवळे या ठिकाणीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले मुख्याध्यापक श्री विष्णू परब सर ,श्री शंकर भुजबळ सर व श्री साटम सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी शिरगाव महाविद्यालय शाळा व महाविद्यालयातील ३०० विद्यार्थांना श्री सुहास पाटील आणि सौ श्रध्दा राणे यांनी जीवन विद्येचे मार्गदर्शन केले व ते विद्यार्थांना खूपच भावले
यामध्ये जीवन विद्या मिशन परिवारातर्फे श्री चंद्रकांत घाडी,मोहन कदम, श्री अमोल पांचाळ, प्रकाश पांचाळ आणि जीवन विद्या मिशन परिवाराच्या कोर्स कोऑर्डीनेटर सौ नेहा मोहिते व शिवानी मोहिते हिने आपल्या सुंदर निवेदना द्वारे विद्यार्थांना जीवन विद्येची ओळख करून दिली अशा पद्धतीने जोगेश्वरी शाखेतील वरील नामधारक यांनी सुंदर असा उपक्रम राबवला