कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कणकवली – कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला अज्ञातानी केला होता. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-धामणी-रेल्वे-स्थानकासम/
याप्रकरणी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी त्या गुन्ह्याचा छडा लावल – बुधवारीत्याच ठिकाणी एका मुलाला गाडीतून येतोस काय? अशी विचारणा केली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी पाठलाग केला असता त्या निळ्या रंगाच्या इको कारने संशयित आरोपी पसार झाले होते.त्या इको कारसह एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या संशयिताने मारहाण केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,लवु ओटवकर यांना तीन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात लोखंडी सळीने प्रहार करून रक्तबंबाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात वापरलेल्या निळ्या रंगाच्या इको कार बाबत गेल्या महिनाभर सीसीटीव्ही फुटेज तपासून काही कार चालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते.अखेर संबधित इको कार (क्रमांक एम. एच. ०७ क्यू २५२२ )मधून काही संशियतांचे टोळके त्या भागात विनाकारण दहशत पसरवण्यासाठी प्रयत्न करत होते. असे समोर आले आहे. तसाच प्रकार दोन-तीन ठिकाणी घडला होता, त्यामुळे पोलीस सतर्क होते.
अखेर त्या संशयिताचे टोळके कोळोशी स्टॉप वर बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तू येतोस का? अशी विचारणा करत असताना आढळून आले. त्यांनी तिथे कार थांबवली होती.तेवढ्यात त्या विद्यार्थ्याला दुचाकीवरून सोडून गेलेले वडील कृष्णा ओटवकर यांनी ते दृश्य पाहिल्यानंतर पुन्हा दुचाकी घेऊन ते माघारी आले. त्यामुळे काही वेळात इको कार चालकाने तिथून पळ काढला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाडीतील व्यक्तीने तुम्ही ओळखीचे असल्याचा खोटा बनाव रचला होता. मात्र कृष्णा ओटवकर यांना ही गोष्ट पटली नसल्यामुळे त्यांनी कणकवली पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांच्या कानावर ती घटना घातली. त्यानुसार कणकवली पोलिसांनी २४ नोव्हेंबरला दुपारी त्या इको कारसह संशयित आरोपी आनंद मनोहर मोंडकर(वय ५०, राहणार चाफेड, ता. देवगड ) याला ओझरम येथून ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिसांनी चौकशी केली असता मच्छीविक्रेते लवु ओटवकर यांना मारहाण केल्याची प्राथमिक कबुली आरोपींने दिली आहे.तसेच अन्य दोन आरोपींची नावांची कबुली पोलिसांकडे दिली.
त्यानुसार त्या दोन आरोपींना कणकवली पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत. दरम्यान संशयित कार सह आरोपी सापडल्यानंतर ओटव सरपंच हेमंत परुळेकर ,दुर्गेश ओटवकर, हिर्लेकर यांच्यासह ग्रामस्थांनी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर , पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे,पोलीस नाईक पाडूरंग पांढरे,चालक आर.के.उबाळे यांचे आभार मानले.