Sindhudurg News: मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे आयोगाचे निर्देश

0
119
मतदान,विधानसभा निवडणुक,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदार संघात बुधवारी सुमारे ७२ टक्क्यापर्यंत मतदान

वेंगुर्ला प्रतिनिधी-  निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत ९ नोव्हेंबर पासून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी अनुषंगाने विशेष मोहिमा राबविण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-औरंगाबादमधील-भाऊसाहेब/

      या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दोन शनिवारी व दोन रविवारी उपस्थित राहणार आहेत. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा आहे. शनिवार १२ व रविवार १३ नोव्हेंबर व शनिवार २६ व रविवार २७ नोव्हेंबर या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. यादिवशी केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंदावर उपस्थित राहणार आहेत. तसेच दावे व हरकती स्विकारण्याची कार्यवाही ८ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे.तालुक्यातील सर्व नवयुवकांनी सदर कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना नं.६ भरावा. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना नं. ६ अ भरावा. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना नं. ७ भरावा. मतदार यादीच्या नोंदीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना नं.८ हा फॉर्म भरावा व आधार प्रमाणिकरणासाठी ६ ब हा फॉर्म भरावा, असे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सौ-सुप्रिया-परब-यांचे-नि/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here