Sindhudurg News: मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी को.पा.म.माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

1
17
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिय
रायगड जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झाली पाहिजे अशी मागणी करत ओसरगाव येथील टोल नाक्यावर घोषणाबाजी करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-हडी-येथील-कट्टर-राणे-सम/

याबाबत पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहेत. या दरम्यान आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी झाली पाहिजे अशी मागणी करत शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी या टोलनाक्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. दरम्यान शिवसेना झिदाबादच्या जोरदार घोषणा देखील देत होते असे या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार या प्रकरणी वृषाली बर्गे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संदेश पारकर, हर्षद गावडे, प्रथमेश सावंत, सुदाम तेली, प्रभाकर सावंत, रिमेश चव्हाण, उमेश लाड, अनंत पिळणकर, मंगेश बावकर, धनंजय हीर्लेकर , बाबू तावडे, पांडुरंग कारेकर, सचिन राणे, चंदू परब, संतोष सुतार यांच्यावर मनाई आदेश भंगप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज सुतार करत आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मच्छीविक्रेते-लवू-ओटवक/

1 COMMENT

  1. […] यावेळी केतन नार्वेकर, संतोष नार्वेकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावी निलेश चव्हाण, सिद्धेश फेंद्रे, राजाराम शिरोडकर, प्रसाद नार्वेकर, समीर परब, अथर्व धुरी , निलेश नाटेकर, आर्यन लोके, प्रथमेश खडपकर, मनिष नाटेकर, उदय फेंद्रे, राजा नाटेकर, शेखर राऊळ, प्रसाद लुमाजी तर उदय जमदार यांनी टेम्पो उपलब्ध करून दिला या कचऱ्याची एका विशिष्ट जागेत जाऊन विल्हेवाट करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मनाई-आदेशाचा-भंग-केल… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here