Sindhudurg News: मालवणसह एकूण सात गावांची मूळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुखच्या गिरोबाचा १० नोव्हेंबरला जत्रोत्सव

0
184

कणकवली I भाई चव्हाण

कणकवली/मालवण:-दि. ७- मालवणसह एकूण सात गावांची मूळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या जागृत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. १० नोव्हेंबरला होणार आहे. आकर्षकरित्या सजविलेल्या पालखी आगमनासमयी ढोलताशांच्या गजरात डोळ्यांची पारणे फेडणारी फटाक्यांची विविध रंगी नयनरम्य आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण असते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधताना गिरोबा मंदिराच्या परिसरात मावळ्यांच्या सोयीसाठी मुख्य बाजारपेठ वसविली होती. या गावातून घोडेस्वारी करीत ते किल्ल्याच्या बांधकामावर लक्ष ठेवत असत. त्यावेळी मालवणसह अलिकडील कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवड, वायरी हि गावे या नांदरुख गावच्या मूळ वाड्या होत्या. त्यामुळे या सर्वं गावांची मूळ ग्रामदेवता ही गिरोबा आहे. तर कुलदेवता देवी भवानी आहे. या इतिहासाचा काही वर्षांपूर्वी इतिहासकारांनी उलगडा केल्याने या सर्वं गावांतील भक्तजण हजारोंच्या संख्येने जत्रोत्सवाला अलोट गर्दी करत असतात https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गावर-प/

काही वर्षांपूर्वी गिरोबाचा धाकटा भाऊ म्हणून मालवणच्या देव रामेश्वराची पालखी जत्रोत्सवा दिवशी गिरोबाच्या भेटीला येत असे. तर आजही मालवण-वायरी परिसरांतील मच्छीमार संघ बरकत व्हावी, म्हणून गावच्या साळकुंभा चाळ्याला बकर्यांचा भक्ष्य देत असतात. मंदिराचा निवांत परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी अलिकडेच या मंदिराच्या मागिल पुरातन तलावाचे लोक वर्गणीच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. लक्ष्मी आदींनी पहाणी केली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसएनडीटी-विद्यापीठात-उ/

जत्रोत्सवा दिवशी रात्रो साडे नऊ वाजता सजविलेल्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तगणांकडून करण्यात येणाऱ्या अर्धा-पाऊण तास फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरात आगमन होते. कुंभारमाठ परिसरातून ही आतषबाजी पहाण्यासाठी भक्त गर्दी करतात. मंदिरात ओटी आदी भरण्याचा विधी आटोपल्यानंतर पालखीची देवादितांच्या लग्न विधीसाठी प्रदक्षिणा सुरू होते. त्यावेळेस पुन्हा फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. रात्रो वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक सुरू होते. परंपरेनुसार प्रभात समयी श्रीकृष्णाकडून दहिहंडी दहिकाल्याची सांगता होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here