वेंगुर्ला प्रतिनिधी- रोटरी ट्रस्ट ३१७० च्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या ३५ हजार रुपयांच्या निधीतून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने हॅपी स्कूल प्रोजेक्टस् अंतर्गत शाळांना साऊंड सिस्टीम ट्राॅली देण्याचा उपक्रम राबविला आहे. यामध्ये वेंगुर्ला येथील दाभोसवाडा, बाळाजी सीताराम नाईक व वेंगुर्ला केंद्रशाळा तर दोडामार्ग रोटरी क्लब कॅश्यू सिटीच्या माध्यमातून दोडामार्ग येथील सावंतवाडा प्राथमिक शाळा व हळबे महाविद्यालय यांचा समावेश आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-news-कोकणातले-गेले-पुण्यात-व/
माजी प्रांतपाल गौरीश धोंड यांच्या हस्ते झालेल्या साऊंड सिस्टीम ट्राॅली प्रदान कार्यक्रमावेळी रणजीपटू जयेश शेट्टी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश साळगावकर, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, राजेश घाटवळ, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट सुनील रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, माजी प्रसिडेंट सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, ट्रेझरर नितीन कुलकर्णी योगेश नाईक, विनय सामंत, दादा साळगावकर, आनंद बांदेकर, संजय पुनाळेकर, आनंद बोवलेकर, मुकुल सातार्डेकर, मृणाल परब, पिंटू गावडे, दिपक ठाकुर, आशिष शिरोडकर, राजू वजराटकर, प्राथमिक शिक्षक प्रसाद जाधव व प्रकाश भोई, शिक्षिका गायत्री बागायतकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा शैक्षणिक प्रकल्प रोटरी वर्ष २०२१-२२ मध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन क्लब प्रेसिडेंट सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, ट्रेझरर नितीन कुलकर्णी व असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटोओळी – रोटरी हॅपी स्कूल प्रोजेक्टस् अंतर्गत साउंड सिस्टीम प्रदान समारंभप्रसंगी माजी प्रांतपाल गौरिश धोंडड, रणजीपटू जयेश शेट्टी, राजेश साळगावकर, दिपक बेलवलकर, राजेश घाटवळ आदी उपस्थित होते.

