वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला आगारातर्फे सलग दुस-यांदा अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी अष्टविनायक यात्रेसाठी वेंगुर्ला आगारातून गाडी निघणार असून भाविकांनी लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन वेंगुर्ला स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-रोटरीतर्फे-पाच-शाळांना/
यात्रेकरुंच्या सोईसाठी वेंगुर्ला आगारातून अष्टविनायक यात्रेचे नियोजन केले आहे. तीन रात्री चार दिवसांचा हा प्रवास असून यासाठी एका यात्रेकरुसाठी २ हजार ७०० रुपये आकारण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला आगारातून यात्रेला प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपले लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी निलेश वारंग (९४२२५८५८५९) किवा मकरंद होळकर (९४०५४९६९७९) यांच्याशी संफ साधावा.


