वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आता पारितोष कंकाळ हे नवे मुख्याधिकारी रुजू झाले आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये तीन वर्ष सेवा बजावल्याने डॉ. अमितकुमार सोंडगे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. विद्यमान नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. दरम्यान सोंडगे यांच्या जागी पारितोष कंकाळ यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. श्री.कंकाळ हे सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. वेंगुर्ला येथे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्यावतीने कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल आणि अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-भंडारी-समाज/
फोटोओळी – वेंगुर्ला नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी पदभार स्विकारल्यानंतर नगरपरिषदेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.