Sindhudurg News: वेंगुर्ला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. श्याम गोडकर

0
101

वेंगुर्ला प्रतिनिधी- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ल्याच्या तीन वर्षासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी अॅड. नारायण उर्फ श्याम गोडकर, उपाध्यक्षपदी वृंदा कांबळी व रमण वायंगणकर, सरचिटणीसपदी प्रा.आनंद बांदेकर यांची तर खजिनदारपदी विकास वैद्य एकमताने निवड करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-येथील-राष्ट्/

वेंगुर्ला हॉस्पिटल नाका येथील स्वामी समर्थ कॉम्पलेक्स मधील मंडळाच्या कार्यालयात संचालक मंडळाची सभा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे सचिव विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला उपस्थितांमध्ये संचालक सुरेश बोवलेकर, सुरेश धुरी, जयराम वायंगणकर, चंद्रकांत गडेकर, प्रा.सचिन परूळकर, आनंद केरकर, बाळू फटनाईक, श्रेया मांजरेकर, अंकिता बांदेकर आदींचा समावेश होता. नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. श्याम गोडकर यांचा मावळते अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी रमण वायंगणकर म्हणाले की, आपल्या भंडारी समाज मंडळास एक उच्च विद्याविभूषित अध्यक्ष लाभल्याने भंडारी समाज मंडळ हे नावारूपाला येण्यास मदत होणार आहे. तुम्ही दाखविलेला विश्वास मी सार्थकी लावेन आणि समाजाच्या उन्नत्तीला अनुसरुन असे काम करणार असल्याचे अॅड.गोडकर यांनी सांगितले. आभार दिपक कोचरेकर यांनी मानले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-पक्षी-सप्ताहानिमित्त-आ/

फोटोओळी- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या नुतन कार्यकारीणी अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांचे मावळते अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here