Sindhudurg News: वेंगुर्ला मिडटाऊनचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद-गौरिश धोंड

1
172
रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनच्या रोटरी सेवा केंद्र शुभारंभप्रसंगी गौरिश धोंड यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- गरजूं रुग्णांना घरगुती उपचारांकरीता आवश्यक असलेल्या ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर, व्हिलचेअर यांसारख्या वैद्यकीय सेवासाधनची मोफत उपलब्धता व्हावी या उद्देशाने रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन सुरू करीत असलेल्या रोटरी सेवा केंद्र हे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असून, वेंगुर्ल्यातील सर्वसामान्यांना लाभ होईल अशा विविध वैद्यकीय रोटरी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, शहर व ग्रामीण भागातील गरजू जनतेसाठी सेवाभावी कार्य वाढवा, यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० व गोवा रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून आपले नेहमीच सहकार्य लाभेल असे प्रतिपादन गोवा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल गौरिश धोंड यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-बागायतदार-नर्सरी-संघट/

      यावेळी त्यांचे समवेत गोवा रणजीपटू जयेश शेट्टी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश साळगावकर, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, रोटरी प्रमोशन डिसिसी राजेश घाटवळ, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट सुनील रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, ट्रेझरर नितीन कुलकर्णी, चार्टर प्रसिडेंट डॉ.राजेश उबाळे, माजी प्रेसिडेंट सदाशिव भेंडवडे, संजय पुनाळेकर, दिलीप गिरप, आनंद बांदेकर, गणेश अंधारी, सचिन वालावलकर, सुरेंद्र चव्हाण, पिंटू गावडे, योगेश नाईक, अॅड.प्रथमेश नाईक, विनय सामंत , दादा साळगावकर, आनंद बोवलेकर, मुकुल सातार्डेकर, मृणाल परब, दिपक ठाकुर, आशिष शिरोडकर, राजू वजराटकर, प्रा.पिटर रॉड्रिक्स, वसंत पाटोळे, दिलीप शितोळे, अनमोल गिरप, आशुतोष मसुरकर आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-शेतीच्या-वीज-पुरवठ्या/

     या वेंगुर्ला रोटरी सेवा केंद्रासाठी २ ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर, ३ व्हिलचेअरची उपलब्धता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० व गोवा रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून गौरिश धोंड यांनी पदान केली. तसेच माझा वेंगुर्ला संचलित अत्याधुनिक कार्डियाक अॅम्ब्युलन्ससाठी आवश्यक असलेली एक व्हिलचेअर अध्यक्ष नीलेश चेंदवणकर, विश्वस्त कपिल पोकळे, यासिर मकानदार यांच्याकडे सुपूर्द केली. यासाठी माजी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन प्रसिडेंट सुनील रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, योगेश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व वैद्यकीय सेवासाधनची मोफत उपलब्धता रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने नाईक अॅग्रो सव्र्हिस, सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे उपलब्ध असून यासाठी योगेश नाईक (९४०५८ २०५८८) व पंकज शिरसाट (८९७५०६७६७७) यांच्याशी संपर्क साधावा.

फोटोओळी – रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनच्या रोटरी सेवा केंद्र शुभारंभप्रसंगी गौरिश धोंड यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here