वेंगुर्ला प्रतिनिधी- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वेंगुर्ला तालुका संफ कार्यालय व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वेंगुर्ल्यातील सप्तसागर येथील पक्ष कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपशहरप्रमुख उमेश येरम यांच्यासह सिद्धेश टेमकर, बाळू सावंत, राजू परब, जगदीश सावंत, अजित गावडे, प्रणव सावंत, मयुरी आरोलकर आदी उपस्थित होते. स्व.बाळासाहेब यांचे विचार जपताना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करु आणि समाजाची सेवा करु असे प्रतिपादन उमेश येरम यांनी केले.
फोटोओळी – उमेश येरम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

