वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत असताना वेंगुर्ला तालुक्यातील भाजपने उभादांडा ग्रामपंचायतीचे शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना भाजपा मध्ये घेऊन आणखी एक धक्का दिला आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण व भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या उपस्थितीत श्री. डिचोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी उभादांडा गावातील प्रलंबित विकास कामांची चर्चा झाली. यावेळी उभादांडा गावातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना दिला. तसेच लवकरच आपल्या सोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील असे डिचोलकर यांनी सांगितले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, दादु कवीटकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.


[…] […]
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला बाजारपेठेतील ज्येष्ठ किराणा व्यापारी आणि कॅम्प-म्हाडा कॉलनी नजिकचे रहिवासी गुरुनाथ केशव शिरसाट (८४) यांचे २० नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य राजेश शिरसाट यांचे ते वडील होत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-शिवसेना-ठ/ […]
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने २६ व २७ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे केलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी सिधुदुर्गचा संघ रवाना झाला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-शिवसेना-ठ/ […]