कुडाळ : जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य यांची जन्मभूमी आणि केरळमधील कोचीन जवळील कालडी येथून पुण्यभूमी काशीपर्यंत वैश्य कुलगुरु हळदीपूर श्री शांतश्रम मठाधिपती प. पू.श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची शांकर एकात्मता पदयात्रा सुरु आहे.
आज रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सावंतवाडी येथे महास्वामीजींचा दर्शन कार्यक्रम झाला. सावंतवाडी येथून पदयात्रेचे प्रयाण पिंगुळी कुडाळकडे झाले आणि या पदयात्रेचे आगमन सायंकाळी 6 वा. श्री प्रणय तेली,पिंगुळी यांचे निवासस्थानी झाले असून मुक्कामही तेथेच आहे. आज सायंकाळी 7 वा. स्तोत्रपठण व महास्वामीजींचे भक्तांना आशीर्वचन व दर्शन सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

