Sindhudurg News: सिंधुदुर्ग येथे पक्षी संशोधन केंद्र सुरु करणार मोरांचा ठेपा – पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

0
88
सिंधुदुर्ग येथे पक्षी संशोधन केंद्र सुरु करणार मोरांचा ठेपा - पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

सिंधुदुर्ग: एकमेव आधुनिक पक्षी संशोधक- सूर्यकांत खंदारे

मोराला भारतीय राष्ट्रीय पक्षी म्हणून 1963 घोषित करण्यात आले आणि वन्यजीव कायादयाच्या अनुसूचित I मध्ये 1972 समाविष्ट करून संरक्षित करण्यात आले.मोराची हत्या करणे, पाळीव करणे ताब्यात ठेवणे हे सगळे प्रकार कायद्याच्या नजरेत शिक्षेस पात्र आहेत.

सिंधुदुर्ग येथे मोरांचा वावर मुक्तपणे मोठया प्रमाणात आहे.कडावळ येथे मोर छान नैसर्गिक जीवन जगत आहे, पण शेतकऱ्याच्या मनात मोराविषयी विष पेरले गेले आहे आणि ते मोरांना शत्रू समजत आहेत. खरे पाहता एक मोर व चार – पाच लांडोरचा कळप 2-3 एकर शेट कीटकपासून मुक्त ठेवतो. त्यामुळे तो शेतकरी मित्र आहे.सोबतच मोर साप खाऊन जैविक समतोल सांभाळतो.या विषयी सांगताना पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे मोरांना दाणे खाऊ घालणे, मोरांची आई, मोरांशी मैत्री, मोरांशी नातं इत्यादी मथल्या खाली मोरांना पाळीव करण्याचे प्रकार होत आहेत.

मानवी बुद्धी वापरून सर्व काही आधीपात्या खाली आणण्याचे अघोरीं स्वप्न नेहमी पाहिले जाते.स्वतंत्र निसर्गाचा आनंद घेण्या पेक्षा हे माझ्या मुळे आहे असे दर्शवण्यात या लोकांना जास्त आनंद होतो. या सर्व प्रकारस पक्षी संशोधक यांच्या मते एकच उत्तर असेल ते म्हणजे मोरांचा ठेपा,ठेपा म्हणजे आधार, ठरलेलं ठिकाण, जिथे मोरांना नैसर्गिक जीवनात जगताना पाहता येईल, त्यांना कुणीही तिथे गुलाम, पाळीव बनवणार किंवा त्यांचे मालक बनणार नाही, त्यांच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभा करून दानापानी करणार नाही. मोरांचा ठेपा जे मोरंच अस्तित्व किती स्वातंत्र्य मुक्त पणे जगात आहे आणि जैविविधता कशा मानवी हस्ताक्षेपशिवाय समवृद्ध असतें हे दर्शवेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here