Sindhudurg News: उत्तर प्रदेशातील आरोपीला पकडण्यात वेंगुर्ला पोलिसांना यश

0
25
उत्तर प्रदेशातील आरोपीला पकडण्यात वेंगुर्ला पोलिसांना यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- आरवली, सोन्सुरे-मधलीवाडी येथील विनायक आत्माराम राणे यांच्या काजूच्या बागेच्या देखभालीकरीता असलेला बिहार येथील रामतपेशा राजभर वय-३८ याच्यावर सुरीने खुनी हल्ला करून पळून गेलेल्या दोन संशयित आरोपींपैकी एकाला उत्तर प्रदेश येथून पकडुन अटक करण्यात वेंगुर्ला पोलीस पथकाला यश आले आहे. दोन महिन्यांपूर्वी हा गुन्हा घडला होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-मिडटाऊनचे-से/

 सोन्सुरे-मधलीवाडी येथील विनायक राणे यांच्या बागेत राजभर हा कामाला होता. तो दिवसभर बागेत काम करून रात्री राणे यांच्या घराशेजारी मांगरामध्ये राहत असे. तसेच तो स्वतःचे जेवण खाणे स्वःत करत असे. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास रामतपेशा राजभर याचे गावाकडील नातेवाईक हरीलाल राजभर वय ३५ वर्षे व त्रिलोकी राजभर वय ५५ हे दोघे त्याच्याकडे राहण्यासाठी आलेले होते. त्यानंतर ते रामतपेशा राजभर याच्या खोलीतच थांबलेले होते. दुस-या दिवशी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास राणे यांच्या घरी आले आणि रामतेपशा राजभर हा रक्ताच्या उलट्या करत आहे असे सांगितले. त्यामुळे तात्काळ रामतपेशा याला दवाखान्यात घेउन जाऊ असे सांगुन माझा भाऊ भिकाजी राणे याला रिक्षा घेऊन येण्यास सांगितले तसेच त्याचे सोबत हरिलाल राजभर व त्रिलोकी राजभर हे देखिल पाठीमागून गेले आणि मधल्या वाटेतून पळून गेले.

दरम्यान राजभर राहत असलेल्या खोलीमध्ये जाऊन राणे यानी पाहिले असता रामतपेशा राजभर याच्या गळ्यातून रक्त येत असलेले पाहिले. त्यामुळे आम्ही त्याला काय झाले असे विचारले असता त्याने आम्हाला त्याचेकडे आलेल्या हरिलाल व त्रिलोकी याने बाजुला असलेली सुरी आपल्या गळ्यावर मारून खुनी हल्ला केला असे सांगितले. त्यामुळे राणे यांनी त्याला शिरोडा उपजिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान वेंगुर्ला पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकरपोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकरपोलीस नाईक योगेश राऊळपोलीस कॉन्स्टेबल राहुल बरगे यांनी उत्तर प्रदेशजि. देवरिया येथे जाऊन तेथील स्थानिक मईल पोलीस स्टेशन च्या मदतीने गुह्यातील प्रमुख आरोपी हरीलाल त्रिलोकी राजभर वय३५रा.देवडी पोस्ट अंडीलातालुका बरहजजिल्हा देवरीया याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला. गुन्ह्यातील आरोपी क्रमांक २ मदन त्रीलोकी राजभर हा सापडू शकला नाही. पण त्याचाही शोध पोलीस घेत आहोत अशी माहिती वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here