Sindhudurg News: कृषी विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डी.एस. दिवेकर

0
66

कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकिकरण, तसेच राष्ट्रीय कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वैयक्तिक कृषी अवजारे, कृषी अवजारे बँक स्थापने करीता शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसाहाय्य केले जाते. त्यामुळे कृषी अवजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन कंपन्यांनी महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत -जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डी.एस. दिवेकर यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मळगाव-घाटीने-घेतला-मोकळ/

जिल्ह्यातील पीक रचनेनुसार पिकांच्या पेरणीपासून काढणीपच्छात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफत दराने यांत्रिकिकरणाची सेवा- सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देणे तसेच लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकिरण सुविधेचा लाभ देणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे. यांत्रिकिकरण या घटकाकरीता पूर्व समत्ती प्राप्त झाल्यानंतर औजारे अधिकृत कंपनीचे विक्रेत्याकडून खरेदी करावे, शेतकऱ्यांची फसणूक होणार नाही. त्यामुळे जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-डॉ-कांताताई-नलावडे-साह/

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षाकरीता कृषी यांत्रिकिकरण उपअभियान योजनेंतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ६० लाख ३६ हजार व राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ३ लाख ५६ हजार असे एकूण ४ कोटी २१ लाख २५ हजार निधी प्रस्तावित आहे. त्यापैकि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतर्गत एकूण १ कोटी ४४ लाख ९२ हजार व राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण ९८ लाख ९१ हजार असे एकूण ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थीच्या खाती रक्कम वर्ग केला आहे. (पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर विडर, ब्रश कटर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, रीपर व इतर) जिल्ह्यात कृषी क्षेत्रामध्ये कृषी यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे.

दिवसेंदिवस शेती कामाकरिता मजूरांची कमतरता भासत आहे. त्याप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरिकिकरण तसेच कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत. वाढत्या महागाईमूळे मजूरांचे दर परवडत नाहीत. कृषी क्षेत्रात कृषी अवजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात हे महत्वाचे प्रमुख पीक असून त्यासाठी चिखळणी, उखळणी, लागवड, फवारणी व काढणीसह सर्व प्रकारच्या कामाकरीता यंत्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यात धरण क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यासाठी मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकिकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकिकरण, तसेच राष्ट्रीय कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वैयक्तिक कृषी अवजारे, कृषी अवजारे बँक स्थापनेकरीता शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसाहाय्य केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here