Sindhudurg News: कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवाहन

0
63
कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवाहन

वेंगुर्ला प्रतिनिधी – सन २०१७-१८ पासून अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित असून, सन २०२२-२३ मध्ये या योजने अंतर्गत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत नवीन विहिर २.५० लाख, जुनी विहिर दुरुस्ती ५० हजार, पंप संच २० हजार, वीज जोडणी १० हजार, शेततळ्यांचे अस्तरीकरण १ लाख इत्यादी घटकांकरीता अनुदान मिळणार आहे. शेतक-यांच्या गरजेनुसार सिंचनासाठी पॅकेजचा लाभ मिळणार आहे. अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी शासनाच्या  mahadbtmait/gov.in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतक-याचे अनुसूचित जाती किंवा नवबौद्धचे जात प्रमाणपत्र, ०.४० हेक्टर जमीन (फक्त नवीन विहिरचा लाभ घेणेसाठी), इतर घटकांसाठी १०.२० हेक्टर जमीन आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड व आधार लिंक केलेल्या बँक पासबूकची प्रत, सन २०२१-२२ चा १.५० लाखचे आत उत्पन्न बाबत तहसीलदार यांचा दाखला अर्जासोबत आवश्यक आहेत. महिला व अपंग लाभार्थ्यांना निवडीत प्राधान्य राहणार आहे. अधिक माहितीसाठी तालुक्यातील इच्छुक शेतक-यांनी वेंगुर्ला पंचायत समितीच्या कृषी विभागाशी थेट संफ साधावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here