Sindhudurg News: नाबाद १०६ ! नांदरुखचे जादुगार ” रघुवीर चव्हाण”

0
65

कणकवली/मालवण -दि. १४- वाढदिवसाला “शतायुषी भव” अशा शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात साठी-सत्तरी गाठायची म्हणजे दमछाक होते. अलिकडे तर जीममध्ये घाम गाळणार्यांनाही ह्रदय विकाराच्या झटक्याने यम महाराजाचे बोलावणे येते. मात्र नांदरुख-पलिकडील वाडी (ता. मालवण) येथील एक शेतकरी असामी रघुवीर तातोबा चव्हाण यांचा आज १०६ सावा वाढदिवस ग्रामस्थांनी साजरा केला.

आयुष्यभर शेती-बागायती, गुरे पाळणे, माड साफसफाई करून नारळ काढणे, मोलमजुरी करणे हा त्यांचा जीवनपट आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही. तरुणपणापासून आजतागायत त्यांची शरीरयष्टी सडसडीत असल्याने ग्रामस्थ त्यांना प्रेमाने “जादूगार रघुवीर” असे संबोधायचे.
आज त्यांच्या नाबाद १०६ साव्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील घरटणवाडीतील तरुण विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन त्यांच्या सौभाग्यवतीच्या समवेत फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच पलिकडील वाडीतील ग्रामस्थांनी अभिष्टचिंतन केले. त्यांचा एक मुलगा पोस्टामधून सेवा निवृत्त तर दुसरा मुलगा शेती करतो. नातवंडासह पंतवडांमध्ये रमतात.

१) रघुवीर चव्हाण यांचा सत्कार करताना ग्रामस्थ २) रघुवीर चव्हाण सौभाग्यवतीसह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here