Sindhudurg News: प्रा.पी.ए.सावंत यांच्याकडे संचालक विस्तार शिक्षण पदाचा कार्यभार

0
44

वेंगुर्ला प्रतिनिधी-दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील शिक्षण विभागाचे कृषी विस्तार प्राध्यापक डॉ.पी.ए.सावंत यांना  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाच्या संचालक विस्तार शिक्षण या पदाचा कार्यभार सांभाळणेबाबत त्यांना पत्र देण्यात आले आहे.

 डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठदाभोलीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.ए.जी.मोहोड यांचा टेन्युअर कालावधी संपल्यामुळे त्या पदाची जबाबदारी डॉ.पी.ए.सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. दि.१३ नोव्हेंबरपासून आपल्या मुळ पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडताना पुढील आदेश होईपर्यंत हा पदभार आपण सांभाळावा असे विद्यापिठाचे कुलसचिव भरत साळवी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

फोटो – पी.ए.सावंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here