वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार आज शुक्रवारी मोहन बापू भोई यांनी स्वीकारला. विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-नुतन-मुख्याध/
कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री. भोई हे सद्या सावंतवाडी पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी लघु पाटबंधारे, कुडाळ येथे कनिष्ठ सहाय्यक उपअभियंता, वेंगुर्ल पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहाय्यक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग येथे अधिक्षक, कणकवली पंचायत समितीमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-नगरपरिषद-हद्/
फोटोओळी – वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विद्याधर सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार गुणात्मकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र आता संख्यात्मक सहकार वाढण्याची आवश्यकता आहे. सहकारात काम करू इच्छिणा-या कार्यकर्त्यांनी सहकारी कायदा व व्यवस्थापन तसेच उपलब्ध संधीचा अभ्यास केल्यास निश्चित आर्थिक उन्नती होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्योग खात्याचे मंत्री असून जिल्ह्यातील शेतकरी महिला यांनी ठरविल्यास करोडो रुपयांची सबसिडी जिल्ह्यात येऊ शकते. व्यक्तिगत प्रकल्प उभा करणे जिल्ह्यात परवडणारे नाही मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून आंबा, काजू, प्रक्रिया उद्योग, काथ्या अगरबत्ती यासारखे उद्योग सुरू झाल्यास रोजगार समस्या राहणार नाही. त्याचबरोबर आर्थिक उन्नतीची दालने उघडतील असे प्रतिपादन सहकार तज्ज्ञ एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मोहन-भोई-वेंगुर्ला-प… […]
[…] प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत (पूर्वीची शालेय पोषण आहार) २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे आदेश केंद्र सरकारने १४ एप्रिल २०२० रोजी दिले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे अन्न शिजविण्याच्या दरासाठी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी (प्रति विद्यार्थी प्रतिदिन) ४ रुपये ९७ पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ७ रुपये ४५ पैसे निश्चित केली आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मोहन-भोई-वेंगुर्ला-प… […]