Sindhudurg News: रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत देसाई स्कूलचे यश

0
71

वेंगुर्ला प्रतिनिधी- रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२२-२३ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या यश मालवणकर (इ. ६वी), वेदा देसाई (इ.४थी) यांनी आर्ट वार्ड ट्राॅफी पाप्त केली. तसेच शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ५ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक, ५ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक आणि ३ विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिक पाप्त केले.

 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका भक्ती परब यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here