प्रतिनिधी-पांडुशेठ साठम
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-2-रिलीजच्या-पहिल्/दृश्यम
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये बळ दिले. अखंड हिंदुस्थानातील हिंदू जागा केला.अशा त्यांच्या आठवणींना उजाळा देत शिक्षक व विद्यार्थ्यांनी बाळासाहेबांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी युवक कल्याण संघाचे खजिनदार मंदार सावंत, सौ. मेघा बाणे, सौ. आदिती सावंत, प्रा. चंद्रशेखर बाबर, एनएसएस कार्यक्रम समन्वयक प्रा. अमर कुलकर्णी ,एनएसएस विद्यार्थी स्वयंसेवक अविकेत कारंडे, सुमित हुसे आदींसह कॉलेजचे इतर शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी कॉलजेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.