वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालय येथे १२ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तालुक्यातील दिवाणीकडील ३, फौजदारी १७, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी व विविध बँका यांच्याकडील एकूण १०३ वादपूर्व करणे तडजोडीने मिटविण्यांत आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील ३२ लाख २३ हजार ७९५ एवढी रक्कम वसुल करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-नाबाद-१०६-नांदरुखचे-जा/
तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांच्या हस्ते झाले. पॅनेल सदस्य म्हणून अॅड.पुनम नाईक यांनी कामकाज पाहिले. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक बी.वाय.वाडीकर, एस.एस.कांबळे, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मुंबई-गोवा-महामार्गाव/
फोटोओळी – वेंगुर्ला येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायाधीश पाटील यांच्या समवेत न्यायालयीन कर्मचा-यांनी प्रकरणे मिटविली.