वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम.के.गावडे, नवनिर्वाचित संचालक ज्ञानेश्वर केळजी, कर्मचारी वैभवी तळकर, विकास कुबल, प्रदीप राणे, हेमंत नाईक, शेतकरी मनोहर कुबल, बाळा कुबल, मंदार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तालुक्यात एकूण ४२१ शेतक-यांनी नोंदणी केली असून भात खरेदी पूर्वी दिवस निश्चित करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एकल-वापर-स्ट्रॉ-ताट-कप-प/
फोटोओेळी – भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.