Sindhudurg News: शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी परवानाधारकांनी अर्ज दाखल करावा

0
236

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

सिंधुदुर्गनगरी, : ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2022 रोजी संपत आहे, त्यांनी आपल्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयात उपचिटणीस शाखेत नेमून दिलेल्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

नुतनीकरण परवान्यासाठी आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे आहे. 1) शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी आवश्यक असलेला फॉर्म- अे-3 परिपूर्ण माहिती भरुन सादर करावा व अर्जदाराने स्वत:चा फोटो अर्जावर लावणे आवश्यक आहे. 2) शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी फॉर्म- एस-4 संबंधित पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे यांच्या सही शिक्क्यानिशी सादर करावा. 3) मूळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. 4) परवाना नुतनीकरण पाच वर्षाकरिता फी रु. 2,500/- (अक्षरी रु. दोन हजार पाचशे फक्त.) शासन जमा करणे आवश्यक आहे. परवाना नुतनीकरणास विलंब झाला प्रतिवर्षी रु. 500/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल. शिवाय नुतनीकरणासाठी विलंब झाल्याबाबतचा सबळ पुरावा सादर करावा लागणार आहे. 5) शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे यांच्याकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. 6) संबंधितांनी सरपंच, पोलिस पाटील, नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवाशी व वर्तणुकीचा दाखला सादर करावा. 7) शस्त्र वापरण्यास शारिरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे फॉर्म एस-3 नमुन्यात एम.बी.बी.एस. डॉक्टरचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 8) अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत किंवा नुतनीकरण झालेले परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

नुतनीकरण परवानाधारकांनी पुढीलप्रमाणे सार्वजनिक सुट्टया वगळून माहे डिसेंबर 2022 या महिन्यातील नेमून दिलेल्या दिवशी तालुकानिहाय उपस्थित रहावे. सावंतवाडी तालुका- दि. 1, 2 व 5 डिसेंबर, दोडामार्ग तालुका- दि. 6 व 7 डिसेंबर, वेंगुर्ला तालुका- दि. 8, 9, व 12 डिसेंबर, मालवण तालुका- दि. 13, 14 व 15 डिसेंबर, वैभववाडी तालुका- दि. 16 व 19 डिसेंबर, कणकवली तालुका- दि. 20, 21 व 22 डिसेंबर, कुडाळ तालुका- दि. 23, 26 व 27 डिसेंबर आणि देवगड तालुका- दि. 28, 29, व 30 डिसेंबर या दिवशी शस्त्र परवानाधारकांनी उपस्थित रहावे.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here