वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे सायबर क्राईम, अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, मद्यप्राशनाचे धोके आदींबाबत उभादांडा सागरेश्वर बीच येथे असलेल्या पर्यटकांना बँड धून वाजवून आकर्षित करत जनजागृती करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मालवण-येथे-राज्यस्तरीय/
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतुन वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागरेश्वर किनारी हा जागृतीचा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस बँड पथकामार्फत सायबर क्राईमबाबत दक्षता, अंमली पदार्थचे सेवनामुळे शरीरावरील व कुटूंबावर होणारे दुष्परिणाम, मद्यप्राशन करून समुद्रामध्ये गेल्याने कशाप्रकारे घातक ठरू शकते त्याचे धोके, मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम व त्यासंबंधी कायद्याचे तरतुदी आदींबाबत मार्गदर्शन व चर्चा करून नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सुरक्षित व निरोगी आणि सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले. या पोलिसांच्या उपक्रमाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यांनी सिंधुदुर्ग पोलिसांचे कौतुक केले.
फोटोओळी – सागरेश्वर बीच येथे जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे ‘बँड धून‘ वाजवून जनजागृती उपक्रम घेण्यात आला.