Sindhudurg News: सुरंगपाणी येथे आज दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

0
146
सुरंगपाणी येथे आज दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

वेंगुर्ला प्रतिनिधी- दत्तजयंतीचे औचित्य साधून खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे ३० नोव्हेंबर पासून दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी ७ वाजता मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प.पू.कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते होणार आहे.

 यावेळी उद्योजक दत्ता सामंत (मालवण), उद्योजक राजाभाऊ गावडे (तळवडे), उद्योजक दिगंबर नाईक (वेंगुर्ला), सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, संजय वेंगुर्लेकर, भाऊ पोतकर आदी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या उद्धाटनानंतर चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘गौरी स्वयंवर‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. महोत्सवांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे नऊ दशावतारी नाट्य मंडळाची नाटके संपन्न होणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-इव्हेंट-२-विभागीय-स्पर/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here