वेंगुर्ला प्रतिनिधी- रविवारपासून सुरु होणा-या दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या, रंगबेरंगी दिसणा-या अशा आकशाकंदीलांनी बाजारपेठ सजल्या आहेत. आकर्षक दिसणारे हे आकाशकंदील सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-बॉलिवूडचा-लोकप्/
दीपावली सणाला आवश्यक असणारे वस्तू बाजारपेठेत दाखल झाले आहेत. यामध्ये आकाशकंदील, चांदणी, मातीच्या आणि चिनीमातीच्या पणत्या, मेणबत्त्या, विविध रंगाच्या रांगोळी, रांगोळी घालण्यासाठी लागणारे साचे आदींचा समावेश आहे. या वस्तूंची नागरिकांकडून खरेदी होत आहे. शनिवारीपासून सुट्टीचे दिवस असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होणार आहे.
फोटोओळी – वेंगुर्ला शहरामध्ये ठिकठिकाणी आकाशकंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

