वेंगुर्ला प्रतिनिधी- आरोग्य दिनाच्या निमित्ताने मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळचे संचालक डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल जनसेवा प्रतिष्ठानतर्फे व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-आठवडाभर-सुंदर/
यावेळी वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे संचालक डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.महेंद्र सावंत, डॉ.संतोष जाधव, डॉ.गोविद जाधव, डॉ.सई लिगवत, डॉ.लेखा रानडे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत तसेच लायनेसचे प्रदिप वेंगुर्लेकर उपस्थित होते. आधुनिकीकरण, प्रगत तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात दिवसेंदिवस वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या विळख्यात सापडल्याने डॉक्टर व रुग्ण यांच्यातील दुजाभाव वाढत असला तरी भविष्यात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना वाढणे काळाची गरज असल्याचे डॉ.संजिव लिगवत यांनी सांगितले.
फोटोओळी – जनसेवा प्रतिष्ठानतर्फे व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांचा सत्कार करण्यात आला.
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रुती श्रीधर शेवडे हिने प्रथम तर साहिल अनिल भाईडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आरोग्य-दिनाच्या-निमित… […]