Sindhudurg: कुडाळ व कणकवली तालुक्यातील शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

0
38
कुडाळ व कणकवली तालुक्यात शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव
शिवजयंती

कुडाळ शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ- शिवसेना शाखा,कुडाळ गांधीचौक रिक्षा युनियन तसेच गावराई, सातरल, हळवल आणि कणकवली शिवसेना शाखा येथील शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सवांना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी भेटी दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.कुडाळ शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-परबवाडा-ग्रा/

कुडाळ शिवसेना शाखा, बसस्थानक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नगर अशी हि रॅली काढण्यात आली.यावेळी पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांनी शिवरायांची वेशभूषा साकारून रॅलीत सहभाग घेतला होता. लहान मुलांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी हातात भगवे झेंडे, डोक्यात भगवे फेटे बांधून शिवरायांचा जयघोष करण्यात आला.

या रॅलीत माजी जि.प. गटनेते नागेंद्र परब कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे,जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, योगेश धुरी, सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, सौ.श्रेया गवंडे, सौ.सई काळप, सौ.श्रुती वर्दम, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रेया परब, रूपेश पावसकर, राजू गवंडे, गुरू गडकर, कृष्णा तेली, पावशी सरपंच वैशाली पावसकर, गुरू सडवेलकर, मंजू फडके, अमित राणे, संदीप महाडेश्वर, नरेंद्र राणे, संतोष अडूलकर यांच्यासह शिवसैनिक तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here