Sindhudurg: कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडीयम नामांतराचा वाद आता सावंतवाडी संस्थांनच्या राजांच्या दरबारी !

0
32
कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडीयम नामांतराचा वाद सावंतवाडी संस्थांनच्या राजांच्या दरबारी !
कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडीयम नामांतराचा वाद सावंतवाडी संस्थांनच्या राजांच्या दरबारी !

सिंधुदुर्ग:(आबा खवणेकर)

कुडाळ इंग्लिश मिडियम संघर्ष समितीच्या वतीने आज सावंतवाडी संस्थांनचे राजे श्रीमान बाळराजे व लखम राजे व राणीसाहेब यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.

यावेळी राजघराण्यातील सर्वांनी शिष्टमंडळाचे म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांच्याशी चर्चा केली. तसेच ही संस्था 100 वर्षा पूर्वीपासून कार्यरत आहे आणि या संस्थेला कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या आशीर्वादाने फार मोठ्या प्रमाणात जमीन शैक्षणिक कार्यासाठी मोफत मिळालेली आहे. याबद्दल राजघराण्याचे कुडाळ इंग्लिश मिडियम संघर्ष समितीच्या – वतीने आभार व्यक्त केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नोंदणीकृत-व-सुयोग्य-व्य/

त्याचबरोबर या नामांतराबाबतची सर्व भूमिका त्यांना सर्वानी समजावून सांगितली. यावेळी शिष्टमंडळाची भावना अशी आहे की, कुडाळ हे आमच्या अस्मितेचे नाव आहे आणि त्यामुळे कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडियमसाठी आम्ही आग्रही आहोत. त्याचप्रमाणे आज डॉक्टर अनिल नेरुरकर यांचं नाव देण्याचा जो घाट घातला जात आहे तो घाट कुडाळवासियांसाठी दुर्दैवी आहे. तसेच संस्थेची जी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या देणगीदाराचं नाव देण्याची भूमिका कुडाळवासियांना पटलेली नाही. शैक्षणिक संस्था ही व्यावसायिक संस्था नाही त्यामुळे असा चुकीचा पांयांडा पडू नये अशी भावना सर्वानी व्यक्त केली.

त्याचबरोबर राजघराण्याच्या दानशूरपणामुळेच आज ही संस्था दिमाखात उभी आहे ही बाब प्रकर्षाने सर्वानी सांगितली. तसेच सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजेंनी आमच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केलं आणि उद्या आम्ही संस्था चालकांची भेट घेऊ…मी कुडाळवासियांच्या अस्मितेसाठी आपल्या सोबत नेहमीच आहे असेही आश्वासीत केले. त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने सर्वानी राजघराण्याचे अत्यंत ऋणी असल्याचे सांगत आभार व्यक्त केले. या शिष्टमंडळात काका कुडाळकर, धीरज परब, राजन नाईक, ओंकार तेली, सुंदर सावंत, निकु माडेश्वर, रतन प्रभू,चिन्मय बांदेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here