ओरोस : भारत सरकारने निपुण भारत अभियानाची सुरुवात केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते इ.3 री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यास सन 2026-27 पर्यंत मूलभूत स्तरावर वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहे. सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामसभेचे आयोजन करावयाचे आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-व्हॅलेन्टाईन्स/
त्यानुसार निपुण भारत अभियान यशस्वी होण्यासाठी समाजाचा सहभागही आवश्यक आहे. ग्रामसभा घेण्यापूर्वी शाळेतून इयत्तावार बालसभा व पालकसभा होणार असून पालक आपल्या मुलाची अध्ययन निष्पत्तीनुसार स्थिती जाणून घेतील. ग्रामसभेमध्ये निपुण भारत अभियान, शाळापूर्व शिक्षण, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती, शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा व भौतिक विकास आराखडा या विषयांवर चर्चा होणार आहे. या शैक्षणिक ग्रामसभेतून विकासाला पोषक ठरतील असे गाव पातळीवर काही निर्णय घेणे अपेक्षित आहे.
सांगली जिल्ह्यातील मोहितेंचे वडगांव येथील ग्रामपंचायतीने संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत सर्वांचे टी.व्ही., मोबाईल बंद असा चांगला उपक्रम घेतला आहे. वाडीनुसार सुट्टीच्या दिवशी. संध्याकाळी अभ्यासिका, अभ्यासात मदत करण्यासाठी विद्यार्थी मित्र, वाचनालय सोय, वर्तमानपत्रे उपलब्ध करून देणे. सुट्टी दिवशी वाचन कट्टा गावातील मोठे वाचतील तर लहान मुलांना वाचनासाठी प्रेरणा मिळेल या उद्देशाने काही उपक्रम अशा विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतले जाणार आहेत. निर्णय झालेल्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती मार्फत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात मदत करण्यासाठी शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत. या सभेस जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडीताई हे उपस्थित राहतील व निपुण भारत अभियाना विषयी माहिती देणार आहेत.