वेंगुर्ला प्रतिनिधी – ३० ते ४० वर्षांपूर्वींची शाळा व आताच्या डिजिटल युगातील शाळा या मुलांसाठी स्पर्धात्मक ठरत असून मुलांनी त्याचा ख-या अर्थाने फायदा घ्यावा व देश सेवेची आवड असणा-या विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये जाऊन आपल्या देशासाठी आपलं योगदान द्यावं असे आवाहन कोंडुरा गावचे रहिवासी व भारतीय सैन्यातील सुभेदार म्हणून सेवानिवृत्त झालेले मंगेश पेडणेकर यांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शिवजयंती-निमित्त-जिल्ह/
वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेच्या डिजिटल रूमचे उद्घाटन मंगेश पेडणेकर यांच्या हस्ते तर डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण राजापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने त्यांनी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती करून दिली. उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख पमोद गावडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, अवधूत नाईक, सुमन कामत, उत्सव समिती अध्यक्ष श्यामसुंदर मुणनकर, सुनील नाईक, सातेरी व्यायाम शाळेचे किशोर सोनसुरकर, राष्ट्रीय क्रीडा पंच अशोक दाभोलकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.बहिराम, शिक्षिका शामाल मांजरेकर, पेडणेकर, दीपा वेंगुर्लेकर, अंगणवाडीच्या पर्यवेशिका परब, सेविका धनश्री घोगळे आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी सुरंगपाणी केंद्र शाळेसाठी लागणाया सर्व गोष्टींची वेळोवेळी पुर्तता केली जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईकवाडी आवरे शाळेचे मुख्याध्यापक स्वामी सावंत यांनी केले. फोटोओळी – सुरंगपाणी केंद्र शाळेच्या डिजिटल रूमचे उद्घाटन माजी सैनिक मंगेश पेडणेकर यांच्या हस्ते झाले.