Sindhudurg: तुळसच्या दिक्षा तुळसकर ‘जिजाऊ’ पुरस्काराने सन्मानित

1
191
तुळसच्या दिक्षा तुळसकर 'जिजाऊ' पुरस्कराने सन्मानित

वेंगुर्ला प्रतिनिधी- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘जिजाऊ पुरस्कार‘ यावर्षीही तुळस येथील दिक्षा दिनेश तुळसकर यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन सरपंच रक्ष्मी परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 तुळस गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील गृहिणी, जिने काबाडकष्टकरून जागृती, कस्तुरी व विजय या तिन्ही मुलांचे पालनपोषण करुन त्यांना कुठल्याही क्लासला न पाठवता घरीच अभ्यास घेऊन विविध स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच त्यांना राज्यस्तरीय बक्षिसे मिळविण्यासाठी मेहनत घेतली. आई-वडिलांनी शिवणकाम करून मुलांचे भवितव्य उज्वल बनविण्यासाठी काबाडकष्ट केले. त्यांच्या या मातृत्वाच्या प्रेरणेची दखल घेत दिक्षा तुळसकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ज्येष्ठ-नागरिकांना-मोफ/

 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाळा सावंत, प्रार्थना हळदणकर, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, हसीनाबेन मकानदार, सुजाता पडवळ, शंकर घारे, संतोष शेटकर, सचिन नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर, जयवंत तुळसकर, रुपेश कोचरेकर, शेखर तुळसकर, प्रथमेश सावंत इत्यादी उपस्थित होते. तत्पूर्वी भाजपा कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि योगीपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. 

फोटोओळी – भाजपातर्फे दिक्षा तुळसकर हिला जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले.

1 COMMENT

  1. […] नवी दिल्ली– दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या पाहण्यासाठी यापुढे सेट टॉप बॉक्सची गरज नाही. त्यासाठी इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असलेले टी.व्ही. उत्पादकांना तयार करावे लागणार आहेत. भारतीय मानक संस्थेने टी.व्ही.साठी ठरवलेल्या नवीन मानकांत याचा समावेश करण्यात आला आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-तुळसच्या-दिक्षा-तुळसक… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here