दोडामार्ग – सिंधुदुर्ग जिल्हातील येथील हत्तीची घुसखोरी आता रोजचीच झाली आहे. दोडामार्ग येथे हत्ती येऊन जवळ जवळ २१ वर्ष झाली. मात्र आजही वनखाते याबाबत संथच आहे. या हत्तींची जनगणनाअजूनही झालेली नाही. जिल्हातील शेतकरी हत्तींनी केलेल्या नुकसानात भरडला जातो आहे. सिंधुदुर्गचे खासदार आणि आमदार याबाबत विधिमंडळात खडाडून प्रश्न विचारत नाहीत आणि उपाययोजना सुद्धा करण्यास सरकारला भाग पाडत नाहीत. हत्तींचे लहान मोठे वर्गीकरण होत असल्याने जिल्हातील शेतकरी भरडला जातो आहे. सरकारला केव्हातरी दया येईल आणि कधीतरी हत्ती बाधित शेतकऱ्याच्या मागे सरकार उभ राहील अशी प्रतिक्षा दोडामार्गवासीय करत आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-संत-राऊळ-महाराज-महाविद्-3/
या हत्तीचं वनखात्यामार्फत बंदोबस्त करणे तर दुरापास्तच आहे पण शेतकऱ्याच्या शेताच्या, बागायतीच्या नुकसानाची भरपाईही कवडीमोल किंमतीने दिले जाते आहे. अलीकडे ४० वर्षांच्या माडाच्या झाडाला ४००० रुपये देऊन शेतकऱ्याची बोळवण केली आहे. केळीच्या बागायतीच्या नुकसानाला जिथे एका केळीच्या घडाला कमीत कमी १४०० रुपये मिळतात तेथे १२० रुपये देऊन शेतकऱ्याची थट्टा केली जात आहे.
शासनाने सुपारी व माड यांसाठी एकच दर ठरवला आहे. पण अधिकारी आपल्या सोयीप्रमाणे लहान मोठे वर्गीकरण करीत असल्याने शेतकरी भरडला जातो आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे लक्षच नसल्याने आणि ऑनलाईन नुकसान अर्ज, सात बारा, आणि आता नकाशा पण, हमीपत्र यातच गोधळून ठेवल्याने येथील शेतकरी हतबल झाला आहे.
छोट्या जंगली प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानाची तर भरपाई होतच नाही. साळिंदरपासून होणारे नुकसान, मानगा बांबू शेतीच नुकसान देय नाही, हत्ती, डुक्कर, साळिंदर, माकड, केल्डी, मोर या प्राण्यांच्यामुळे होणारे नुकसान तर शेतकरी सांगतही नाही आणि ते कोणी जमेतही धरत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या बागायतीचे अनेक जंगली प्राण्यांकडून नुकसान होत असते. त्यामुळे हा शेतकरी जगणार कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्याला कोणताच आधार अगदी पूर्वीपासूनच मिळालेला नाही. कोकण हा मागास भाग आहे . याउलट पश्चिम महाराष्ट्रात वर्षाला एक शासन निर्णय, आणि शेतकऱ्यांसाठीच्या भरघोस योजनांचा या शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. कोकणात मात्र फक्त सागवान, शिवण, फणस शेतात लावण्याचे आवाहन असते पण दोडमार्ग तालुक्यात झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी दिव्य करावे लागते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा अनेक समस्या आहेत पण येथील खासदार आमदार यांना या समस्यां दिसणे आवश्यक आहे आणि त्या केव्हा दिसतील याची दोडामार्गचा शेतकरी प्रतीक्षा करीत आहे.