सिंधुदुर्ग- केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून अनेक शेतकरी आऊट झाले आहेत. सातबाऱ्यावर शेतीचा उल्लेख नाही. शेती करीत नाही अशी कारणे देत त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी हा अहवाल दिला आहे तो खरा आहे की खोटा याची खातरजमा न करता लाभ बंद झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मुंबई-गोवा-महामार्ग-मृत/
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी हातभार लागावा म्हणून केंद्र शासनाने २०१९ मध्ये पीएम व किसान सन्मान योजना आणली, त्यानुसार दर ४ महिन्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यात २ हजार रूपये जमा केले जात आहेत. योजना आणतेवेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. ज्याच्या नावे सातबारा त्याला लाभ असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले. त्यानुसार अनेक वर्षे सर्वांना लाभही देण्यात आला. त्यानंतर मात्र सरकारी कर्मचारी व उत्पन्न अधिक असल्याने लाभ मिळणार नाही असा फतवा काढत दिलेले पैसे पुन्हा घेण्यात आले त्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे.