प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ला– चोरटे कातकरी समाजातील असल्याचे समजते – वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल –
वेंगुर्ले पोस्ट आॅफिस नजिक असलेल्या शिरोडकरांच्या बागेत घूसुन सायंकाळी सहाच्या दरम्यान कातकरी समाजातील काही तरूण त्रिफळे काढत असल्याचे समजताच आंबा बागेचे मालक शिरोडकर यांनी आपल्या बागेतील त्रिफळा चोरी विषयी त्या तरूणांना जाब विचारला असता सदर तरूणांनी शिरोडकर यांच्या आंगावर धावून येत शिविगाळ करित दगड फेक केली आणि काढलेल्या त्रिफळांच्या पोतली सहीत घटना स्थळाहून एम एच ०८ ए ए ४००४ या मोटार सायकल सह पसार झाले. सदर घटनेचा तक्रार अर्ज पोलिस ठाणे वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


