प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी – सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात छोट्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे सुमारे 13 लाख 50 हजार रुपये किमतीची 50-60HZ लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशीन मंजूर करण्यात यावी अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. – छोट्या शस्त्रक्रियेसाठी गोरगरीब रुग्णांच्या गुरुद्वार मुखावर(मुळव्याधी) मोड तसेच फीशर आल्यानंतर रक्तस्राव होऊन अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी परराज्यात जावे लागते किंवा पारंपारिक शस्त्रक्रिया करवून घेतल्याने दिर्घकाळ बेडरेस घ्यावी लागते.त्यात वेदनाही सहन कराव्या लागतात.
सदरच्या यंत्रामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना लवकर आराम मिळून आठ दिवसांमध्ये रुग्ण दैनंदिन आपले काम करू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया खाजगी किंवा शासकीय रुग्णालयामध्ये अशा यंत्रसामुग्रीची सुविधा नसल्याने रुग्णांना गोवा बांबुळी येथे नाईलाजास्तव जावे लागते तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने तसेच खाजगी रुग्णालयामध्ये गोवा कोल्हापूर किंवा मुंबई येथे रुग्णांना यासाठी 50 ते 60 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी खर्च येतो. यामुळे गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये सदरील शस्त्रक्रिया करावी लागते.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनरल सर्जन उपलब्ध असल्यामुळे अशा शस्त्रक्रिया होऊ शकतात. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला 13 लाख 50 हजार रुपये किंमतीचे लेझर मशीन (यंत्र)मंजूर करण्यात यावे अशी विनंती पालकमंत्री यांस पाटवीलेल्या पत्रातून केली आहे.

