Sindhudurg :बड्या बँकांना मोठे करण्यापेक्षा, सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज : सुरेश प्रभु

0
66
बड्या बँकांना मोठे करण्यापेक्षा, सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज : सुरेश प्रभु
बड्या बँकांना मोठे करण्यापेक्षा, सहकारी बँकांना ताकद देण्याची गरज : सुरेश प्रभु

पुणे– एकूणच जगातील काही बड्या बँका डबघाईला जात असून, अशा बँकांना वाचवण्यासाठी सरकारला करदात्यांचे पैसे वापरावे लागत आहे. यामुळे आता मोठ्या मोठ्या बँकाना आणखी मोठे करण्यापेक्षा लहान सहकारी बँकाना आणखी मोठे करण्याऐवजी छोट्या सहकारी बँकांचे सक्षमीकरण घडवून आणल्यास, ते यशस्वी ठरेल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आशा-भोसले-यांना-मुख्यमं/

राष्ट्रीयकृत बड्या बँकाप्रमाणेच अद्ययावत तंत्रज्ञान, व्यवस्थापन इत्यादी संसाधने सहकारी बँकाना पुरवल्या पाहिजेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना व्यक्त केले. पुणे येथील एका सहकारी बँके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्तआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभू म्हणाले, “सहकारी बँकांची समाजाबद्दलची बांधिलकी आणि समाजासोबत असलेलं नात्याचा फायदा घेत, अशा बँकांचे सक्षमीकरण करायला हवे. अले केल्यास नवी समाजरचना तयार होण्यस मदत होईल. बँकांनी जास्तीत जास्त महिलांना उद्योग-व्यवसायासाठी पैसा उपलब्ध करून, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास साहाय्य केले पाहिजे. याचा फायदा म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या सदृढ होऊन, ती वाढीस होईल. समाजाचा तळागाळापर्यंत विकास साधायचा असेल तर सहकारी बँकांची गरज आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here